HomeCrimeदेशी कट्टा आणि माउझर गन सह जिवंत काडतुसे जप्त

देशी कट्टा आणि माउझर गन सह जिवंत काडतुसे जप्त

चंद्रपूर शहरात ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशी कट्टा आणि माउझर गन सह जिवंत काडतुसे इत्यादी शस्त्र साठा जप्त करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांच्या रेकॉर्ड वर असलेल्या आरोपीकडून हि घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून शहर पोलिसांच्या डीबी पथकाने मोठ्या शिताफीने हि कारवाई केली आहे. या प्रकरणी ४ आरोपींना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
शहर परीसरामध्ये पेट्रोलींग करीत असता चंद्रपुर शहर पोलिसांच्या चे रेकार्डवरील आरोपी बल्लारपूर निवासी छोटु सुर्यवंशी हा आपल्या काही साथीदारासह काळया रंगाच्या डस्टर कारने गंजवार्ड, चंद्रपुर दादामिंया ट्रान्सपोर्ट गॅरेज समोरील परिसरात देशी कट्टा घेवून येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. पोलिसांनी धाड घातली असता तिथे असलेल्यापैकी चौघे पळुन गेले तर 4 आरोपींना पोलीसांनी शिंताफीने ताब्यात घेतले. तसेच त्यांचे डस्टर कार मधून 2 देशी कट्टे व 2 माउझर गन अग्रीशस्त्र, एकुण 35 जिवंत काडतुस तसेच 4 लोखंडी खंजर मॅनसह व ईतर साहित्य असा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular