Homeचंद्रपूरचंद्रपूर पोलीसांकडून सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम, प्रवाशांना दिले सायबर सुरक्षिततेचे मार्गदर्शन

चंद्रपूर पोलीसांकडून सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम, प्रवाशांना दिले सायबर सुरक्षिततेचे मार्गदर्शन

दिवाळीसाठी ऑनलाईन शॉपिंगची क्रेज वाढत असतांना ऑनलाईन सायबर भामटेही
सकिय झाले आहेत. फेस्टीवलच्या विविध ऑफरच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांचाही *सेल
मोड?” ही ऑन झालेला आहे. बनावट ई-कॉमर्स वेबसाईट, फेक कुपन कोड्स, क्युआर स्कॅम,
रिवार्डस पॉईन्ट कॅशबॅक ईत्यादिच्या नावाखालील डेटा चोरणारे अप्स झपाटयाने वाढत आहेत.

ऑक्टोंबर, २०२५ हा राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरुकता म्हणुन पाळला जात असुन या महिण्यात पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळया शाळा, महाविद्यालय व ईतर शैक्षणिक ठिकाणसह वेस्टर्न कोल्ड फिल्डस लि. च्या वेगवेगळया एरीया मधील कार्यालयात नागरीकांना सायबर स्वच्छता, ऑनलाईन फसवणुक प्रतिबंध आणि सुरक्षित डिजीटल पध्दतीबद्दल व्यावहारीक ज्ञान देऊन सक्षम करण्याचे उददेशाने सतत सायबर जनजागृती कार्यकम घेणे सरु आहे.

सध्या दिवाळी सणानिमित्त बरेच नागरीकांचा वेगवेगळया गावात / शहरातुन आवागमन
सुरु आहे. त्यातच सुट्टयाचा कालावधीत असल्याने बँक सुध्दा बंद असल्याने सायबर
गुन्हेगारांकडुन याच वेळी नागरीकांना वेगवेगळ्या फसव्या कॉल करुन त्यांची आर्थीक हाणी
होण्याची शक्‍यता पाहता पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या संकल्पनेने आज बुधवारी सकाळी
चंद्रपूर बस स्थानक आणि चंद्रपूर रेल्वे स्टेशन येथे सायबर पोलीस स्टेशनचा पथकांनी
प्रवाश्यांना सायबर सुरक्षा जनजागृती संदेश देऊन सुरक्षित ऑनलाईन व्यवहारबदल मार्गदर्शन केले ,

नागरीकांना खात्यातुन पैसे गेल्याचे समजताच शक्‍य तितक्या लवकर सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास पैसे वाचण्याची शक्‍यता जास्त असते.त्यामुळे आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात शक्‍यतो लवकरात लवकर १९३० किंवा १९४५ या हेल्पलाईन कमांकावर संपर्क साधावा. किंवा सायबर. क्राईम. गव्हर्मेंट. इन यावर ऑनलाईन रिपोर्ट करा.इत्यादी बाबत जनजागृती करण्यात आली.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular