शनिवारी अचानक गडचिरोली जिल्हयातील कोरची तालुक्यात विजेच्या गडगडाटीसह पाऊस पडला. धानाची कापनी सुरू आहे.काहींनी पुंजण्यावर ताळपत्री टाकण्यासाठी कोरची इथून 18 किमी अंतरावर असलेल्या केसालडाबरी शेत शिवारात शनिवारी दुपारी 1.30 वाजताच्या दरम्यान विज पडून 17 वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला तर त्याचा सोबती योगेश गावळे हा जखमी झाला आहे.
सरगम कोरचा असे १७ वर्षीय मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून हा मुलगा छत्रपती विद्यालय मसेली या शाळेत 10 व्या वर्गात शिकत होता. २५ ऑक्टोबरचा दुपारी 1.30 वाजताच्या दरम्यान विजेच्या गडगडाटीसह पाऊस पडला.शेतावर असलेले धानाचे पुंजणे पावसाने भिजू नये म्हणून पुंजण्यावर ताळपत्री टाकण्यासाठी सरगम आणि योगेश हे दोघेही शेतात गेले होते. पाऊस सुरू होता म्हणून हे दोघेही शेतातील मोहाच्या झाडाखाली होते.वडील सोमनाथ काही अंतरावर होते.झाडावर वीज पडल्याने सरगम आणि योगेश जागीच पडले. योगेश गावळे याला चिचगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर सरगम कोरचा याला कोरची ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले.सरगम कोरचा याला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर योगेश गावळे यांचावर उपचार सुरू आहे. सरगम याच्या मृत्यूमुळे कोरचा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे



