घुग्घुस येथील राजीव रतन रेल्वे फाटकाजवळ नगरपरिषदेची पाण्याची पाईपलाइन फुटल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. पाण्यामुळे याठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे.दरम्यान, पुलाच्या बांधकामाचे काम सुरू असलेल्या परिसरातही रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने पाणी साचले असून, अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असले तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
घुग्घुस नगरपरिषदने फुटलेल्या पाईपलाइनची त्वरित दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा.पुलाच्या बांधकामापूर्वी नागरिकांसाठी पर्यायी सुरक्षित मार्गाची व्यवस्था करण्यात यावी. पाईपलाइन कायमस्वरूपी दुरुस्त करून पाण्याचा निचरा योग्य रितीने होईल अशा पद्धतीने स्थायी उपाययोजना करण्यात यावी.अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



