HomeGraminदोन मुलांचा वर्धानदी पात्रात बुडून मृत्यू, वरोरा येथील घटना

दोन मुलांचा वर्धानदी पात्रात बुडून मृत्यू, वरोरा येथील घटना

पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोघे पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना वरोरा तालुक्‍यातील तुळाणा गावानजीक वाहणाऱ्या वर्धानदीच्या पात्रात रविवारी घडली. मुले नदीत बुडत असताना एका गुराख्याने प्रसंगावधान राखून दोन मुलांना वाचविण्यात यश मिळविले.

रूपेश कूळसगे आणि प्रणय भोयर असे बुडालेल्या मुलांची नावे आहेत. उमंग आत्राम आणि कृष्णा कुईजडे या दोघांना नदीपात्रातून सुखरूप वाचविण्यात आले. वरोरा येथील कर्मवीर वॉर्डातील रूपेश आणि प्रणय हे दोघे सायकलने मित्रांसोबत तुळणा गावाजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले होते. मात्र, नदीपात्रातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने सर्व मुले बुडू लागली. मुलांनी आरडाओरड केली असता मुलांचा आवाज ऐकून परिसरातील गुराख्याने घटनास्वळाकडे धाव घेतली. यावेळी
गुराख्याने बुडणाऱ्या चारपैकी उमंग आणि कृष्णाला नदीपात्रातून बाहेर काढले. या घटनेची
माहिती वरोरा पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चंद्रपूर येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. मात्र, रूपेश आणि प्रणयचा शोध घेण्यास रेस्क्यू टीमला यश मिळाले
नाही. दरम्यान, रात्र झाल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular