Homeचंद्रपूरदिवाळीत एसटीला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद, एसटीने दिवाळीत कमावले पाच कोटी १३ लाख...

दिवाळीत एसटीला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद, एसटीने दिवाळीत कमावले पाच कोटी १३ लाख रुपये, दिवाळीच्या दिवसांपासून आताही प्रवाशांची बसस्थानकावर प्रचंड गर्दी

दिवाळीच्या सुटीत प्रवाशांची झालेली मोठी गर्दी आणि प्रभावी शेड्यूल राबवण्याच्या धोरणामुळे चंद्रपूर एसटी महामंडळ विभागाने यंदा विक्रमी उत्पन्नाची नोंद केली आहे. १८ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत विभागाने तब्बल २३१ शेड्यूल पूर्ण करून १० लाख ८० हजार किमीचा प्रवास केला असून, ५ कोटी १३ लाख ९२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. मागील वर्षी याच काळात हे उत्पन्न ४ कोटी ६७ लाख ३१ हजार रुपये इतके होते.

म्हणजेच यंदा सुमारे ४६ लाख रुपयांची भर विभागाच्या खात्यात पडली आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद जोपासत लालपरी धावत असते. दिवाळीत सुट्या असल्याने अनेकजण बाहेरगावी जाण्यास पसंती देत असतात. त्यामुळे बसफेऱ्यांमध्ये दिवाळीच्या काळात प्रचंड गर्दी असते. साधारणतः १८ ऑक्टोबरला दिवाळीच्या सुट्या लागल्या.

त्यामुळे पहाटेपासून तर संध्याकाळपर्यंतच्या बसमध्ये मोठी गर्दी दिसून आली. १८ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत चंद्रपूर विभागातील चारही आगारात प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या १२ दिवसांच्या काळात चंद्रपूर विभागाला तब्बल पाच कोटी १३ लाख ९२ हजारांचे उत्पन्न मिळाले.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular