चंद्रपूर शहरात संडे मार्केटसाठी अधिकृत परवानगी असताना, मुख्य रस्त्यावर बेकायदेशीर दुकाने लावण्याचा प्रकार वाढत चालला आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
रविवारी न्यु इंग्लिश हायस्कूल येथे एमपीएसीचा परीक्षेचा पेपर असल्याने, महापालिकेच्या विनंतीनुसार संडे मार्केट व्यापाऱ्यांनी आपला बाजार बंद ठेवला होता. मात्र, त्या दिवशीही काही व्यापाऱ्यांनी मुख्य रस्त्यावर बेकायदेशीर पद्धतीने दुकाने लावली. या भागात दुकान लावण्यास मनपा प्रशासनाकडून कोणतीही परवानगी नसतानाही दर रविवारी अशा दुकानांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
या अनधिकृत व्यवसायामुळे आझाद गार्डन, बायरिस्टर राजाभाऊ खाेबरागडे पुतळा चौक आणि चर्चसमोरील परिसरात त्याच प्रमाणे सरकारी दवाखाना या परिसरात वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते.एम्बुलेंस ,अग्निशमन ची वाहन व पादचारी आणि वाहनचालकांना रस्ता पार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही महानगरपालिका आणि वाहतूक विभाग कारवाई करत नसल्याचा आरोप परिसरातील रहिवाशांनी केला आहे. या अतिक्रमण करण्यात येणाऱ्या रस्त्यावर कोणत्या विभागाच्या आशीर्वाद आहे महानगर पालिका आयुक्त की ट्रैफिक पोलिस अधिकारी. हे पाहाने गरजेचे आहे .
या समस्येवर तात्काळ उपाययोजना करून मुख्य रस्त्यावर बेकायदेशीर दुकाने लावणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील शिस्त आणि वाहतुकीचे नियोजन सुरळीत राहावे, यासाठी मनपा प्रशासन आणि वाहतूक विभागाने संयुक्त मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे



